शहरातील मुख्य १३ रस्त्यांवर ऑफ स्ट्रीट पार्किंग

२१ डिसेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवड शहर ज्या प्रमाणात विस्तारत चालले आहे, त्याच प्रमाणात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे . यावर काही अंशी तोडगा म्हणून शहरातील मुख्य १३ रस्त्यांवर ‘ ऑफ स्ट्रीट पार्किंग’चा फंडा महापालिकेकडून केला आहे. यामध्ये तूर्तास बारा हजार ८२ वाहने पार्किंग करण्यासाठी उड्डाणपूल , मोठ्या इमारती , मेट्रो उड्डाणपुलाखालील जागा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहितीदेखील आयुक्त शेखर सिंह यांनी दिली . स्थायी समितीने ३१ ऑगस्ट २०१ ९ च्या केलेल्या ठरावानुसार सल्लागाराची नेमणूक ‘ ऑफ स्ट्रीट पार्किंग’साठी करण्यात आली आहे . पार्किंगच्या मिळालेल्या रकमेतून ४ ९ व ५१ टक्के रक्कम महापालिका व कंत्राटदारात विभागून घेतली जाणार आहे. शहरातील आरक्षित पार्किंगसाठी असलेल्या जागांचा यात समावेश केला जाणार आहे.

नियोजित ‘ ऑन स्ट्रीट ‘ पार्किंग निगडी वाल्हेकरवाडी रोड , जुना पुणे मुंबई रस्ता , टिळक चौक ते बिग इंडिया , पिंपरी – कासारवाडी – दापोडी – आकुर्डी रेल्वेस्टेशनच्या दोन्ही बाजू , हिंजवडी ते चिंचवड स्टेशन , काळेवाडी फाटा ते एम्पायर इस्टेट , नाशिकफाटा – वाकड – औंघ रावेत रस्ता , टेल्को – नाशिकफाटा – मोशी रस्ता , साई चौक , जगताप डेअरी , डांगे चौक , काळेवाडी फाटा , मर्सिडीज बेंज शोरूम , चापेकर चौक


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *