सीमाभागातील एक-एक इंच जागा महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे; सीमावादावर अजित पवारांनी मांडली भूमिका

२१ डिसेंबर २०२२


राज्याची एक इंचही जमीन देणार नाही, अशी भूमिका कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी कर्नाटक विधानसभेत घेतली. सीमा वादावर झालेल्या चर्चेदरम्यान राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव पास करण्याची सूचना केली. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाचे वातावरण आज तापण्याची शक्यता आहे. अशातच, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, कर्नाटकने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. कामकाज सल्लागार कमिटीची बैठक झाली. त्यावेळेस सगळ्यांनी मागणी केली होती की आपले अधिवेशन सुरु असताना आपण सर्व जण मराठी भाषिकांच्या बाजूने आहोत. आणि ही सर्व जागा महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे. एक-एक इंच जागा महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे ही आमची व महाराष्ट्रवासियांची भूमिका आहे. आणि विधीमंडळामध्ये तशा प्रकारचा ठराव हा आणला जाणार आहे आणि तो एकमताने दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्याबद्दल विरोधी पक्ष पाठिंबा देणार आहे. यामुळे आपल्या येथेही हा ठराव केला जाणार आहे. सातत्याने बोम्मई त्यांच्या भागातील नागरिकांना कर्नाटकवासियांना बरे वाटण्यसाठी तशी विधाने करत आहेत. आपल्याही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आक्रमक भाषा वापरली पाहिजे. त्याच्यातून महाराष्ट्रातील सीमावासिय मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला समाधान वाटेल. जशात तसे उत्तर दिले पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *