खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

निगडी : जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने महिलेवर कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून केल्याची घटना निगडी प्राधिकरण येथे 2011साली घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश वडगाव मावळ यांनी सोमवारी जन्मठेपेसह पाच हजार रुपये दंड, पुरावा नष्ट करणे या गुन्ह्यासाठी तीन महिने साधा कारावास आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यासाठी सात वर्षे  कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना आरोपी लक्ष्मण वाघ हा मयत शितल ओहोळ यांच्या घरासमोर असलेल्या महादेवाच्या मंदिरात बराच वेळ विनाकारण बसत होता, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा आकुर्डी, प्रधिकरण परिसरता शोध घेतला परंतु तो सापडला नाही.  त्यामुळे पोलिसांच्या एका पथकाने त्याच्या मुळगावी जाऊन त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला 19 सप्टेंबर 2011 रोजी अटक करुन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *