पिंपरी चिंचवड महापालिकेस वैद्यकीय उपकरणे भेट…. श्री. संदीप वाघेरे व भैरवनाथ मंदिर ट्रस्ट पिंपरी वाघेरे गाव यांचा स्तुत्य उपक्रम…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी : ३ जून २०२१
पिंपरी चिंचवड शहरात म्युकर मायकोसीस रुग्णांची परिस्थिती गंभीर होत असताना रुग्णावर वेळेत व व्यवस्थितरीत्या उपचार होणेकामी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे व भैरवनाथ मंदिर ट्रस्ट पिंपरी वाघेरे गाव  संचालित महालक्ष्मी मरीआई माता मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेस वैद्यकीय उपकरणे भेट देण्यात आली. सदर वैद्यकीय उपकरणांचा स्विकार आयुक्त राजेश पाटील यांनी केला.
यावेळी बोलताना वाघेरे म्हणाले कि, पिंपरी वाघेरेगाव येथील महालक्ष्मी मरीआई माता मंदिर येथील भाविकांच्या वतीने दक्षिणा पेटीमध्ये आठ लाख सत्तर हजार रुपये ( ८७००००/- )  जमा झाले होते. सदर रक्कमेचा उपयोग म्युकर मायकोसीस रुग्णांसाठी व्हावा असा निर्णय भैरवनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने  घेण्यात आला होता. त्यानुसार मंदिराच्या मार्फत जमा झालेली रक्कम व उर्वरित सहा लाख तीस हजार (६३००००/- ) अशी एकूण  पंधरा लाख ( १५०००००/- ) रुपयांची वैद्यकीय उपकरणे श्री.संदीप वाघेरे व महालक्ष्मी मरीआई माता मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेस भेट म्हणून देण्यात आली.सदर वैद्यकीय उपकरणे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे वापरासाठी देण्यात येणार आहे.यासाठी वायसीएम रुग्नालयाचे डॉक्टर अनिकेत लाठी,डॉक्टर परमानंद चव्हाणव डॉक्टर सुनील पवार यांचे मार्गदर्शन लाभले. सदर  वैद्यकीय उपकरणामध्ये कॅमेरा,०  व ७० डिग्री स्कोप, एल.ई.डी. लाईट, फायबर ऑप्टीक केबल,मेडीकल  ग्रेड मॉनीटर, नेक्सास एम –  २ मायक्रोडीब्रायडर यांचा समावेश आहे.
यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी संदीप वाघेरे व समस्त पिंपरी वाघेरे ग्रामस्थांचे आभार मानत म्हणाले कि,हि  महापालिकेस सर्वांच्या वतीने  योग्य वेळी देण्यात आलेली बहुमूल्य भेट आहे. सद्या वायसीएम रुग्णालयामध्ये एकूण म्युकर मायकोसीस आजाराने बाधित ९८ रुग्ण दाखल आहेत.परंतु रुग्णालयामध्ये असलेल्या रुग्णावर ऑपरेशन करण्यासाठी सहा ते सात तास लागत आहेत या उपकरणामुळे ऑपरेशन जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे, आयुक्त राजेश पाटील  भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र गणपत वाघेरे, अतिरक्त आयुक्त विकास ढाकणे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठीता डॉ. राजेंद्र वाबळे,वस्ताद दत्तोबा नाणेकर, किसन कापसे,जयवंत शिंदे,पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, अंकुश वाघेरे,सुदाम नाणेकर,पोपट महाराज इंगळे,रामभाऊ वाळूंजकर,मनोहरबुवा  सुभेकर, अंकुश कापसे, रामभाऊ कुदळे,विजय जावळे,सीताराम भूमकर,विजय जाचक, सुरेश नलावडे,तसेच महालक्ष्मी मरीआई मंदिरचे सभासद हरीश वाघेरे,अक्षय नाणेकर,किरण वाघेरे, संकेत भालेराव,शरद कोतकर,राकेश मोरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *