पिंपरी चिंचवडच्या एक लाख २२ हजार ४७६ रेशन कार्ड धारकांना मिळणार लाभ

पिंपरी प्रतिनिधी
१० ऑक्टोबर २०२२


महागाई वाढत असल्याने सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून रेशन दुकानांवर दिवाळी पॅकेज उपलब्ध करून देण्यात येणार आहे . यात एक किलोच्या परिमाणात रवा , चणाडाळ , साखर व एक लिटर पामतेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्यांची दिवाळी गोड होणार आहे. पिंपर -चिंचवड शहरातील एक लाख २२ हजार ४७६ रेशनकार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोरोना महामारीनंतर अनेक कुटुंबांची वाताहत झाली. तसेच कुटुंबातील कमावती व्यक्ती मयत झाल्याने अनेकांचे हाल झाले

शिधा पॅकेज प्रत्यक्षात २७० रुपये किमतीचे आहे . मात्र , शासन ते १०० रुपयांत देणार आहे त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पात्र लाभार्थी कुटुंबांनी हे पॅकेज घेतल्यास एक कोटी २२ लाख ४७ हजार ६०० रुपये शासनाला मिळणार आहेत. प्रत्यक्षात या प्रत्येक पॅकेजसाठी शासनाला २७० रुपये , तर शहरातील सर्व लाभार्थ्यांना पॅकेज उपलब्ध करून देण्यासाठी एकूण तीन कोटी ३० लाख ६८ हजार ५२० रुपये मोजावे लागणार आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *