पुणे जिल्ह्यातील १७६ ग्रामपंचायतीसाठी ८० टक्के मतदान

१९ डिसेंबर २०२२


पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती वगळता १७६ ग्रामपंचायत साठी रविवार (ता.१८) रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली. जिल्ह्यातील काही तालुक्यामधील ग्रामपंचायतीमध्ये तुरळक वादविवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये एकूण ३ लाख ३ हजार २१३ मतदारांपैकी २ लाख ४५ हजार १६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अतिशय चुरशीने झालेले या निवडणुकांमध्ये एकूण ८० टक्के मतदान झाले.

पुणे जिल्ह्यातील डिसेंबर २०२२ अखेर मुदत संपणाऱ्या २२१ ग्रामपंचायतची निवडणूक होती. या निवडणूकीमध्ये ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली.तर ५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकही अर्ज न आल्याने त्या गावचे सरपंच पद रिक्तच राहणार आहे. १६७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी व एकूण १७६ ग्रामपंचायतीसाठी ६५१ मतदान केंद्रावर मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण १८५३ सदस्य पदाच्या जागांपैकी ७१२जागा बिनविरोध झाल्या तर ७९ सदस्य पदासाठी एकही अर्ज आला नाही.यामुळे उर्वरित १०६२जागांसाठी मतदान झाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *