तासगाव तालुक्यात कोरोनात वाढ; शहरातील कोरोना वाढीवर जबाबदार कोण,? शहर हाय होल्टेजवर

राजू थोरात तासगाव सांगली जिल्हा प्रतिनिधी

तासगाव शहरात दिवसे दिवस कोरोना रुग्णात वाढ होत आहे..नगरपालिकेने बेधडकपणे कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.
नगरपालिका स्वताची जबाबदारी पोलिसांच्यावर ढकलून मोकळे होते.. पोलीस अहोरात्र जीवाची बाजी लावून आपली ड्युटी पार पाडत आहेत.पण वाढत्या रुग्णसंख्येवर नगरपालिकेतील एक नगरसेवक बोलायला तयार नाही..
नगरपालिकेतील अधिकारी निर्णय घ्यायला तयार नाहीत. शहरातील वाढत्या रूग्ण संख्येवर जबाबदार नेमके कोण? हा प्रश्न मोठा पडला आहे…
शहरात गर्दीच गर्दी पहायला मिळत आहे..
तासगाव तालुक्यातील 26 गावातून 84 कोरोना बाधित रुग्ण तर दोघांचा मृत्यू;—आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश कांबळे यांनी दिली माहिती
तासगाव तालुक्‍यात 26गावातून 84 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर डिस्चार्ज 59 रुग्णांना आज दिला आहे. तर आज दोघांचा मृत्यू झाला आहे..
अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश कांबळे यांनी दिली आहे.. पुढे डॉक्टर कांबळे यांनी माहिती दिली तासगाव 12 आळते 3आरवडे 5 बस्तवडे 3बेंद्री 1बोरगाव 5 चिंचणी 4 दहिवडी 4ढवळी 1डोरली 1 हातनुर 1कवठेएकन्द 2कौलगे 9 कुमठे 5लोढे1 मनेराजुरी4 नागाव क 2 नेहरूनगर 1निमणी 2 पानमळेवाडी1 पेड1 सावळज 2 शिरगाव वी 1 वडगाव4 वायफळे1 येळावी8 अशा 26 गावातून 84 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
तर आज दोघांचा मृत्यू झाला आहे आज डिस्चार्ज 59 रुग्णांना दिला आहे
. आज अखेर कोरोना बाधित रुग्ण संख्या 12633 झाली आहे..आज अखेर डिस्चार्ज रुग्णसंख्या 11055 झाली आहे..होमआयसोलेशनमध्ये 912 रुग्ण उपचार घेत आहेत..आज आखेर 379रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे…अँटीजेनटेस्ट 987 नागरिकांची घेतलेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *