स्वतःचा क्यूआर कोड लावून पंपमालकाची फसवणूक

१६ डिसेंबर २०२२

पिंपरी


पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दोन कामगारांनी स्वतःच्या बँक खात्याचा क्यूआर कोड वापरून त्यावर ग्राहकांचे पैसे घेतले . अशा प्रकारे कामगारांनी पंप मालकाची २१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली . हा प्रकार १ ऑगस्ट ते ८ नोव्हेंबर या कालावधीत भोसरी येथील लक्ष्मी एनर्जी अँड फ्युएल पंप येथे घडला . गणेश सुरेश लांडगे ( ३५ , रा . इंद्रायणीनगर , भोसरी ) यांनी बुधवारी ( दि . १४ ) याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव बाळासाहेब जाधव ( रा . दिघी ) रोहित विजय माने ( रा . भोसरी ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या बॅक माहितीनुसार , आरोपी वैभव आणि रोहित हे फिर्यादी लांडगे यांच्या पेट्रोल पंपावर काम करत होते . त्या वेळी त्यांनी पेट्रोल पंपाच्या खात्याचा क्यूआर कोड लावण्याऐवजी स्वतःच्या बँक खात्याचा क्यूआर कोड लावला त्यावर ग्राहकांचे पैसे घेऊन तब्बल २१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली . हा प्रकार डिसेंबर महिन्यात उघडकीस आला . त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . भोसरी पोलिस तपास करीत आहेत


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *