महामोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी केली तर; संजय राऊत इशारा

१६ डिसेंबर २०२२


भाजपचे नेते आणि राज्यपाल यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान त्याचप्रमाणे कर्नाटक सीमा वादाचा सुरू असलेला प्रश्न यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. शिवसेना, काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह समविचारी पक्षांचा मुंबईत मोर्चा १७ डिसेंबरला निघणार आहे. अद्याप या मोर्चाला सरकारकडून परवानगी मिळाली नाही. यासाठी शिवसेना (ठाकरे गट ) राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्षांनी कार्यकर्त्यांना जमवण्यासाठी तयारीला सुरुवात केलीय. यासाठी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकाही पार पडताना पाहायला मिळत आहे.

याचपार्श्वभूमीवर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, हे सरकार जर महामोर्चाला परवानगी नाकारणार असेल तर सत्तेवर महाराष्ट्रद्रोही सरकार बसलंय असं म्हणाणं लागेल. परवानगी नाकारली तर त्याचे फार मोठे परिणाम महाराष्ट्राच्या जनतेत उमटतील. मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही. तसेच खरतर सरकारमधील लोकांनी मोर्चात सामील होणं गरजेचं एकीकडे महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान सुरु आहे. दुसऱ्या बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सीमाप्रश्नाबाबत फुरफुरत आहेत. राज्यातील उद्योग बाहेर जातातेय. हा महाराष्ट्रावर खूप मोठा अन्याय असल्याचे संजय राऊत म्हणाले.

संयुक्त महाराष्ट्राच्या काळात महाराष्ट्र प्रेमींचे मोर्चे निघाले होते. तशाप्रकारचा मोर्चा उद्या निघणार आहे. घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात सत्तेवर बसलं आहे. आम्ही कोणतंही काम घटनाबाह्य करत नाही. हे सरकार लोकशाही पद्धतीला विरोध करत असल्याचे राऊत म्हणाले. आम्ही लोकशाही मार्गाने चाललो आहोत. त्याच मार्गाने आम्ही तुम्हाला सत्तेवरुन खाली खेचू असेही राऊत यावेळी म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *