आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्यांना दिलासा, आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचीट

१५ डिसेंबर २०२२


भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं क्लीन चीट दिली आहे. आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत युद्धनौकेसाठी जमवलेल्या कोंटीवधींच्या निधीचा अपहार प्रकरणी सोमय्या पितापुत्रांविरोधात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याची कबुली मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली आहे. या अहवालाबाबत कोर्टात लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

भारतीय नौदलात महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आयएनएस विक्रांत ही युद्धनौका भंगारात काढण्याऐवजी तिची डागडूजी करून संग्रहालय रूपात जतन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यासाठी भाजप खासदार किरीट सोमय्यांसह त्यांचा पुत्र नील सोमय्यानं पुढाकार घेऊन मुंबईत ठिकठिकाणी लोकाकडून मदतनिधी उभारण्याचा घाट घालत सुमारे ५७ कोटींचा निधी जमा केला. मात्र या निधीचा सोमय्या पिता-पुत्रांनी अपहार केल्याचा आरोप करून माजी सैनिक बबन भोसले यांनी ७ एप्रिल २०२२ रोजी तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी सोमय्या पिता-पुत्रांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई सत्र न्यायालयानं यादोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *