नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणार्‍या महंत 108 श्री स्वामी या भामट्या भोंदूबाबास घोडेगाव पोलीसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले.

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१८ जुलै २०२२

घोडेगाव


नोकरी लावतो म्हणून आंबेगाव तालुक्यातील तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणार्‍या भामट्या भोंदूबाबास घोडेगाव पोलीसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले आहे.

घोडेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं147/2021भा.द.वि.क.420,507 मधील फिर्यादी महंत बेलनाथ महाराज गोरक्षनाथ आश्रम कमलजामाता मंदीर राजेवाडी, वय 59 वर्षे, धंदा- देवसाधना व किर्तन/ प्रवचन , रा राजेवाडी ता.आंबेगाव जि. पुणे यांनी आरोपी प.पु महंत108श्री स्वामी रामानंदजी महाराज, तथा श्री विनायक पांडुरंग उईके, रा श्री संत भाकरे महाराज सेवा आश्रम,श्री क्षेत्र चांधणी बर्डी, पोस्ट खराडी ता नरखेडा जि. नागपुर यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना नोकरीस लावतो असे आमिष दाखवून नोकरीस न लावता त्यांचेकडून एकुण 2,51,000रू घेऊन त्यांना नोकरीस न लावता त्यांची फसवणुक केलेबाबत गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीस नागपूर येथे जाऊन अटक करण्यात आल्याची माहिती घोडेगावचे दंबग साहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.

सदर गुन्ह्याची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक डॉ.श्री. अभिनव देशमुख सो.मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.मितेश घट्टे सो.मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुदर्शन पाटील सो.यांचे मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलिस स्टेशनचे स.पो.नि.श्री.जीवन माने,पो.उप निरीक्षक श्री.अनिल चव्हाण पो.कॉ.निलेश तळपे,पो.कॉ. सोमनाथ होले यांनी कामगिरी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *