छगन भुजबळ हे जामीनावर बाहेर आहेत हे त्यांनी लक्षात असू द्यावे – चंद्रकांत पाटील

१२ डिसेंबर २०२२


राष्ट्रवादीचे नेते , छगन भुजबळ हे जामीनावर बाहेर आहेत हे त्यांनी लक्षात असू द्यावे असे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना आठवण करून दिली.भुजबळ यांनी शाईफेक ही कित्येक लोकांवर होते मग हल्लेखोरांना ३०७ हे गंभीर कलम का लावले असे म्हटले होते. त्याला उत्तर देताना पाटील यांनी प्रशासनाचे त्यांचे काम केले आहे आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. भुजबळ यांना सुद्धा न्यायदेवतेने जमीन दिला आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा न्यायदेवतेवर विश्वास ठेवावा असा पाटील यांनी भुजबळ यांना टोला लगावला .

लोकशाही पद्धतीने निषेध नोंदवण्यास माझा कोणताही विरोध नव्हता. मात्र ज्या पद्धतीने हल्लेखोरानी माझ्यावर शाही फेक केली ती डॉ. आंबेडकर यांच्या घटनेला धरून नव्हती. मी दिलगिरी व्यक्त करूनही हा भ्याड हल्ला झाला. ही बाब घटनेच्या कोणत्या चौकटीत बसते असे मत पाटील यांनी व्यक्त केले. पाटील म्हणाले, हा हल्ला नियोजित होता. पडद्याआडुन कट रचणारे हल्ले सापडले आहेत. माझ्या मनात डॉ बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा जोतिबा फुले यांच्याबाबद्दल कोणताही अनादर नाही. तरीही कोणाचे मन दुखावले असेल तर त्याची मी मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र हा भ्याड हल्ला ठरवून केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *