प्रिय बाबा, तुम्ही सर्वांसाठी ऊर्जेचा अखंड स्रोत; शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

१२ डिसेंबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय तसंच सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळातूनही त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.सुप्रिया सुळे यांनी ट्वीटकरत शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील तुम्ही आम्हा सर्वांचे आदर्श आहात. तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल घेऊन आम्ही सर्वजण आपल्यासोबत अविश्रांत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत.बाबा, तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *