पुण्यात रिक्षाचालक संघटना आक्रमक; रिक्षाचालक आजपासून पुन्हा संपावर

१२ डिसेंबर २०२२

पुणे


रिक्षाचालक पुन्हा एकदा चक्काजाम आंदोलन करणार आहे. त्यामुळे पुण्यातील रिक्षा वाहतूक सोमवारी बंद राहणार आहे. रिक्षा संघटनांच्या मागण्या मान्य न झाल्याने रिक्षाचालक पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल एक लाखाहून अधिक रिक्षाचालक बंदमध्ये सहभागी होणार आहेत. १४ दिवसांचा अल्टिमेटम देऊनही प्रशासनाने मागण्या पूर्ण केल्या नाही. त्यामुळे प्रशासनाने फसवल्याचा आरोप करत रिक्षा चालक संघटना आंदोलनावर ठाम आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाई केली नाही असा आरोप संघटनांनी केल्या आहेत. आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालक चक्काजाम आंदोलन करणार आहे.याआधी रिक्षाचालक संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे पुणेकरांचा मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. तसेच खासगी वाहनचालकांनी प्रवाशांच्याकडून आणि विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकरले होते. त्यामुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागू शकतो.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *