श्री विघ्नहर विद्यालयात 75 वा स्वातंत्र्य दिन झाला उत्साहात संपन्न

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
१६ ऑगस्ट २०२२

ओझर


भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन ओझर येथील श्री विघ्नहर विद्यालयात अतिशय उत्साह पूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. विघ्नहर देवस्थान ट्रस्ट व विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे यांच्या शुभहस्ते तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर सर्व ओझरकर ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थ्यांनी ध्वजाला सलामी देत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले.

गणेश भाऊ कवडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले ध्वजाचे ध्वजारोहन

यानंतर ढोल ताशांच्या सुंदर अशा आवाजात विद्यालयातील स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना देत ,सलामी देत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पथसंंचलन केले. वरून राजाची साथ, विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर घोषणा यामुळे वातावरणात एक प्रकारचा देशभक्तीचा माहोल या ठिकाणी तयार झाला होता.

या कार्यक्रमास विघ्नहर विद्यालयाचे मुख्याध्यापक साबळे एस. बी. सर, चासकर सर, गणेश राऊत सर ,सगर सर ,माजी रिटायर्ड शिक्षक खोल्लम सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ त्याचप्रमाणे विघ्नहर देवस्थानचे सर्व पदाधिकारी , माजी अध्यक्ष बी.व्ही. अण्णा मांडे , अध्यक्ष गणेश भाऊ कवडे ,उपाध्यक्ष अजित कवडे ,खजिनदार किशोर कवडे ,मंगेश मांडे, सूर्यकांत रवळे ,दशरथ मांडे , शहाजी रवळे तसेच देवस्थानचे सर्व सदस्य ,कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे ओझर १ व २ च्या सरपंच मथुराताई कवडे ,तारामती कर्डक , विठ्ठल जाधव , जयश्री कवडे , मिरा जगदाळे , अक्षदा मांडे ,गणपतराव कवडे , शिरीष, राजश्री कवडे, शिरीष बोराडे विविध संस्थांचे पदाधिकारी ,गावातील सर्व तरुण वर्ग , सर्व महिला पदाधिकारी व समस्त ग्रामस्थ मंडळी ओझरकर व पत्रकार बांधव या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सर्व पाहुण्यांचे आभार व सूत्रसंचालन गणेश राऊत सर यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *