महापुरुषांच्या अवमानाचा निषेध म्हणून पंकजा मुंडे आज अर्धा तासासाठी पाळणार मौन

१२ डिसेंबर २०२२


भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपा नेत्या पंकजा मुंडेदेखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्या अर्धातासाचे मौन बाळगणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांचा अवमान होत असून त्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून हे मौन पाळणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात अप्रिय घटना घडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्रवीर सावरकर यांच्यासह इतर महापुरुषांचा अवमान करण्यात आला आहे. राजकारणात अशा प्रकारे महापुरुषांचा वापर करणं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवर होणारे अत्याचार अशा गंभीर घटनांचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी आम्ही मौनव्रत पाळणार आहोत, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. तसेच हे मौन अर्धा तासाचं असेल असेही त्या म्हणाल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *