संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं, पुन्हा आरामाची वेळ येऊ नये – शंभूराज देसाई

०७ डिसेंबर २०२२


शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी तोंड आवरावं, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत, अन्यथा त्यांना चोख उत्तर दिलं जाईल, असं म्हणत देसाई यांनी राऊतांना इशारा दिला आहे.

संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं, आताच तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करुन तुरुंगाबाहेर आला आहात. तुरुंगाबाहेरच वातावरण तुम्हाला मानवत नाही असं वाटतंय, म्हणून तुम्ही अशी वक्तव्य करताय. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्य करणं टाळावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य केल्यास आम्ही दोन हात करायला तयार आहोत, असं देसाई यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक वादावर आम्ही चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. केंद्रानं या प्रकरणात लक्ष घालावं. संजय राऊत यांची बोलण्याची पद्धत महाराष्ट्र सहन करणार नाही. संजय राऊतांना षंड बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं, असा इशारा देसाई यांनी राऊतांना दिला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *