युवक काँग्रेस चे रोजगार दो अभियान
पिंपरी चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने आज फेमस चौक, नवी सांगवी व मोरे चौक, चिखली येथे “रोजगार दो अभियान” राबवण्यात आले.
या प्रसंगी रोजगाराच्या प्रमुख मागणीसाठी युवक काँग्रेस च्या राष्ट्रीय “रोजगार दो अभियान समर्थन” क्रंमाकावर (7998799854) बेरोजगार युवकांकडून मिस्ड काॅल्स देऊन रोजगार दो अभियानास समर्थन देण्यात आले.


या उपक्रमाची माहिती देताना युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “युवकांसाठी वर्षाला 2 कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर आले, पण परिस्थिती वेगळीच आहे.

नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगारनिर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्याची परिणती म्हणजे करोडो रोजगार नष्ट होण्यात झाली.त्यात वस्तू सेवा कराच्या (GST) चुकीच्या अंमलबजावणीमूळे कुटीर- लघु-मध्यम क्षेत्राचे आणि उद्योगधंदयांचे पार कंबरडे मोडले गेले. याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली.
पंतप्रधान मोदी यांच्या 20 लाख करोडच्या पॅकेजमधून बेरोजगार युवक, शेतकरी वा लघु-मध्यम उद्यगक्षेत्र, यापैकी कोणत्याही घटकास मदत झाली नाही.

पंतप्रधान मोदींनी दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासनाला जागून रोजगार निर्मितीवर लक्ष दिले पाहिजे.युवक हे निराश झाले आहेत, आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. केंद्र सरकारने रोजगारनिर्मितीची स्वत:ची जबाबदारी ढकलून चालणार नाही. तरुण हातांना काम हवे आहे.
मोदी सरकारकडे आमची मागणी एकच आहे, रोजगार दो ! व या मागणीसाठी युवांनी 7998799854 या क्रमांकावर मिस्ड काॅल द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.”
या प्रसंगी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ शिंदे, यश काटे, अर्णव कामठे, प्रथमेश कुंभार, ऋषिकेश खेडकर, मयुर तिखे, रोहित जगताप, अश्विन खामकर आदि उपस्थित होते.