भारत विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनचे विक्रमी द्विशतक

१० डिसेंबर २०२२


ईशान किशनने वनडे क्रिकेटच्या इतिहासातील झळकावलेल्या सर्वात वेगवान द्विशतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात ५० षटकात ८ बाद ४०९ धावा केल्या. ३ सामन्यांची मालिका भारताने २-० ने आधीच गमावली आहे.

तिसऱ्या वनडेत बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या सामन्यात दुखापत झाल्याने रोहित शर्मा संघाबाहेर झाला. त्याच्या जागी केएल राहुलकडे नेतृत्व देण्यात आले होते.दुखापतीमुळं संघाबाहेर झालेल्या रोहित शर्माच्या जागी शिखर धवनसोबत ईशान किशन मैदानावर आला. धवन ४ धावा करून बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि विराट कोहली यांनी गोलंदाजांची बेदम धुलाई केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २९० धावांची विक्रमी भागिदारी केली.

करिअरमधील तिसरी वनडे खेळणाऱ्या ईशान किशनने फक्त १३१ चेंडूत २१० धावांची खेळी केली. यात १० षटकार आणि २४ चौकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट १६०.३१ इतका होता. ईशानच्या पाठोपाठ रन मशीन विराट कोहलीने करिअरमधील ७२वे शतक पूर्ण केले. त्याने ९१ चेंडूत ११३ धावा केल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *