भाजपा कार्यकर्ते देशाप्रति समर्पित भावनेतून कार्यरत : आमदार महेश लांडगे…शहर भाजपाच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

– वृक्षारोपणासह शहरातात ठिक-ठिकाणी सामाजिक कार्यक्रम

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि १६ ऑगस्ट २०२१
भाजपा आणि पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता देशासाठी समर्पित भावनेते कार्यरत आहे. देशसेवा करत असतानाच सामाजिक बांधिलकी जपत लोकसेवाही तितकीच महत्वाची आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास झाला, तरच देशाचा विकास होणार आहे. यामुळे लोकसेवा हीच खरी देशसेवा आहे, अशा भावना पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी स्वातंत्र्यदिनी (दि.१५) व्यक्त केल्या.
शहर भाजपातर्फे अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरीतील मोरवाडी येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शहराध्यक्ष लांडगे यांच्यासह युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव सिंग, महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, दक्षिण भारत आघाडी प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस बाबू नायर, राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, केशव घोळवे, नगरसेवक विलास मडीगेरी, नगरसेविका शारदा सोनावणे, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस अनुप मोरे, वैशाली खाडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, महिला शहराध्यक्ष उज्वला गावडे, शोभा भराडे, गीता महेंद्रू, मुक्ता गोसावी, अंजली पांडे, कविता करदास, तेजस्विनी कदम, सारिका चव्हाण, कोमल शिंदे, नीलिमा गोलर, संजय पटनी, निखील काळकुटे, अनिल लोंढे, आनंदा यादव, प्रदीप बेंद्रे, माऊली थोरात, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, देवदत्त लांडे, पूजा आल्हाट, धनंजय शाळीग्राम, राजदीप तापकीर, जयदेव डेमरा, सातपाल गोयल तसेच पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच पक्ष, संघटन यावर चर्चा करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागातील नागरिकांशी संवाद साधून अडचणी सोडवाव्यात, अशा सूचना लांडगे यांनी यावेळी दिल्या.

*
आमराई ट्रस्टच्या वतीने वृक्षारोपण
मोशी प्राधिकरण येथे आमराई कॉलनी येथे ‘आमराई चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. आमराई ट्रस्टचे शिवराज लांडगे आणि हर्षल बाबर यांच्यातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन आणि पर्यायाने वृक्षांचे महत्व सर्वांना समजले आहे. यामुळे वृक्षारोपणाला पर्याय नाही. याच पार्श्वभूमीवर उपक्रम राबवल्याचे शिवराज लांडगे यांनी सांगितले. यावेळी विलास मडेगिरी, योगेश लांडगे, निखिल काळकुटे, हनुमंत अण्णा लांडगे, रोहन उगले, अमित साळुंखे, प्रसाद आल्हाट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *