शहरामध्ये गोवर झालेल्या बालकांच्या संख्येत वाढ

१० डिसेंबर २०२२

पिंपरी


शहरामध्ये गोवर झालेल्या बालकांच्या संख्येत वाढ झाली आहे. आत्तापर्यंत गोवरचे एकूण १३ बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये थेरगाव परिसरात नव्याने ३ तर, मोशी येथे एक बाधित रुग्ण आढळला आहे. शहरामध्ये २९ नोव्हेंबरला सर्वप्रथम कुदळवाडी परिसरात गोवरचे ५ बाधित रुग्ण आढळले. तर, गेल्या ११ महिन्यांत ३ जणांना यापूर्वी गोवरची लागण झाली होती, असे एकूण 8 बाधित रुग्ण होते. मात्र, हा आकडा वाढून आता १३ रुग्णसंख्येवर जाऊन पोहोचला आहे.

नव्याने वाढलेल्या ५ रुग्णांमध्ये एक नेहरुनगर परिसरातील आहे. मात्र, या रुग्णाचा जून महिन्यातील अहवाल आत्ता प्राप्त झाला आहे. त्यामुळे तो गोवरचा जुना रुग्ण आहे. तथापि, थेरगाव येथील कुमार प्रॉपर्टीजमध्ये २, डांगे चौक परिसरात १ आणि मोशी येथे १ असे एकूण ४ गोवरचे रुग्ण नव्याने आढळले आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *