रोमहर्ष अंतिम लढतीत हॉकी पंजाब ने हॉकी उत्तरप्रदेशवर शूट आऊट मध्ये मात करूत ठरले चॅम्पियन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२२ डिसेंबर २०२१

पिंपरी 


११ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात हाॅकी पंजाबने हाॅकी उत्तरप्रदेशवर शूटआऊटमध्ये २-१ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले. तर उपविजेता ठरलेला हाॅकी उत्तरप्रदेश संघ रौप्य पदकाचा मानकरी ठरला. तिस-या स्थानासाठी कर्नाटक विरुध्द महाराष्ट्र यांच्यात लढत झाली, यामध्ये कर्नाटकने महाराष्ट्राचा ३ गोलाच्या फरकाने पराभव करत कांस्य पदक पटकावले. विजेत्या संघास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला.

हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ ते २२ डिसेंबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ च्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्राम स्टेडियम, नेहरूनगर पिंपरी येथे महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, शहर सुधारणा समिती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती माधवी राजापुरे, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती उत्तम केंदळे, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र लांडगे, माजी ऑलिम्पियन हॉकी खेळाडु विक्रम पिल्ले, नगरसदस्या अपर्णा डोके, सुजाता पालांडे, अश्विनी जाधव, शारदा सोनवणे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, हॉकी इंडियाचे सहसचिव फिरोज अन्सारी, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मनिष आनंद, सरचिटणीस मनोज भोरे, सहशहर अभियंता सतिश इंगळे, संदेश चव्हाण, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे आदी उपस्थित होते.  या स्पर्धेची सांगता महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *