पुण्यातील लक्ष्मी रोडवर रविवारी वॉकिंग प्लाझा

१० डिसेंबर २०२२

पुणे


पुणे महानगरपालिकेच्या वतीने ११ डिसेंबर रोजी पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौक ते गरूड गणपती चौकदरम्यान वॉकिंग प्लाझाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी नऊ ते दुपारी तीन यादरम्यान या रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे.

पुणे महापालिकेच्यावतीने पादचारी दिनाचे औचित्य साधून पादचाऱ्यांसाठी रविवारी लक्ष्मी रस्त्यावर खास वॉकिंग प्लाझा” आयोजित केला आहे. हा उपक्रम सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत वॉकिंग प्लाझा होणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक या दरम्यान वॉकिंग प्लाझा आयोजित केला आहे. त्यामुळे या दरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीला बंदी असणार आहे. सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौक या दरम्यान वाहतुकीची परिस्थिती पाहून आवश्यकतेप्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलीस विभागाने दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *