महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही – बसवराज बोम्मई

१० डिसेंबर २०२२


महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद चिघळण्याची शक्यता असून कर्नाटकचे मुख्यमंत्री अजूनही आक्रमक विधानं करत आहेत. सीमावादाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असताना देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विविध विधानं करून वाद छेडला. यामुळे सीमाभागात तणाव निर्माण झाला. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावर बसवराज बोम्मई यांना विचारले असता. त्यांनी महाराष्ट्राला डिवचले आहे. महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही, असे बसवराज बोम्मई म्हणाले.

या वादावर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील काही गावांवर दावा केला होता. तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केली होती. महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली होती. त्यामुळे या वादाला हिंसक वळण लागले होते. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासोबत चर्चा करत आहेत. पण, बोम्मई आपला ताठरपणा सोडायला तयार नाहीत. माझे कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी बोलणे झाले आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच, या प्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही. तसेच, अमित शहांबरोबर सीमाप्रश्नावरून कोणतीही चर्चा झाली नाही, असे बोम्मई यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *