अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार..

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.11/9/2021

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, ग्रामीण भागात बलात्काराच्या घटनेत होतीय वाढ

बातमी:-विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

जुन्नर l एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबध ठेवत ८ लाख रूपये किमतीच्या दागिन्याचा अपहार केल्या प्रकरणी आळेफाटा (ता.जुन्नर) पोलीसांनी आरोपीस अटक केल्याची घटना शनिवार (दि.११) घडली.
याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने तिच्या सोबत वेळोवेळी शारीरिक संबध ठेवले तसेच तिला विश्वासात घेऊन अडचणीचे कारण दाखवुन तिच्याकडून २० ते २१ तोळे सोन्याचे दागिने त्यांची ऐकुन किंमत ८ लाख रूपये याचा अपहार केलेला असुन विक्रम देवराम डोंगरे (वय २८) राहणार पिंपयाळवंडी (ता.जुन्नर) या आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे.पुढील तपास आळेफाटा पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *