निगडी येथील अमृता विद्यालयाला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यमुनानगर शाखा यांचेकडून आंदोलनाचा इशारा
बातमीदार: रोहित खर्गे, विभागीय संपादक
दि ११ सप्टेंबर, निगडी

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, यमुनानगर निगडी
विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करावे व हप्त्यात सवलत दिली नाही तर शालेय व्यवस्थापनाकडे मागणी केली. शाळेतील व्यवस्थापन सदस्यांनी कार्यकर्त्यांसोबत बराच वेळ हुज्जत घातली. पण शेवटपर्यंत अनेक कारणे सांगून मुख्याध्यापिकेंची भेट नाकारली.
जवळपास अर्धातास कार्यकर्त्यांना बंदिस्त खोलीत चर्चेसाठी ठेवले पण मुख्याध्यापिकांना भेटू दिले नाही. व अडमुठेपणाचे धोरण घेतले.

युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शेवटी निवेदन शालेय व कॉलेज व्यवस्थापनेच्या सदस्यांच्या हाती निवेदन देत, त्यावर 2 दिवसात लेखी प्रतिक्रिया मागितली असून, तसे न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

ह्या वेळेस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे निगडी चिखली मंडल अध्यक्ष शिरीष जेधे, आदित्य कुलकर्णी, भाजपचे निगडी चिखली मंडलाचे सरचिटणीस रमाकांत पाटील, मंडलाचे उपाध्यक्ष बाबा परब, प्रज्ञावंत आघाडीचे शहराचे अध्यक्ष दीपक कुलकर्णी, प्रथमेश आंबेरकर , प्रकाश चौधरी, ऋषिकेश भालेकर, तन्मय भालेकर , व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.