वल्लभनगर बसस्थानकात कर्नाटकच्या बसला सुरक्षा

०८ डिसेंबर २०२२

पिंपरी


कर्नाटकमध्ये सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पासिंग असणाऱ्या वाहनांची कन्नड संघटनांनी तोडफोड केली .या वादामुळे महाराष्ट्र – कर्नाटक एसटी बस सेवेवर परिणाम होईल , अशी शक्यता होती . मात्र , पिंपरीतील वल्लभनगर आगारातून कर्नाटकसाठी सोडण्यात येणाऱ्या एसटी बसची सेवा सुरळीत असल्याची माहिती वल्लभनगर आगारातून देण्यात आली . वल्लभनगर आगारातून विजापूरसाठी दोन एसटी बस तसेच गाणगापूरसाठी दोन बस आणि कर्नाटकवरून हैदराबादसाठी जाणारी एक बस धावते.

गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न चिघळला असून , कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचे पासिंग असणाऱ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली . मात्र , पिंपरीच्या वल्लभनगर आगारातून कर्नाटकसाठी सोडण्यात येणाऱ्या एसटी बसची सेवा सुरळीत सुरू आहे .वल्लभनगर आगारात बंदोबस्त वल्लभनगर आगारात कर्नाटकच्या बस येत असतात . तसेच आगाराच्या बाहेरदेखील कर्नाटकच्या बस उभ्या असतात. सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला आहे  दोन पोलिस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *