केंद्र व राज्य सरकारच्या भरीव विकासकामांमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता – चंद्रकांत पाटील

नारायणगाव,दि. १९ (किरण वाजगे, कार्यकारी संपादक


वारूळवाडीत जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

केंद्र व राज्य सरकारच्या धडाकेबाज विकासकामांमुळे तसेच विविध कल्याणकारी योजनांमुळे विरोधक चिंतेत असून ते अस्वस्थ असल्याची टीका उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. वारूळवाडी (ता.जुन्नर) येथील जलजीवन मिशन अंतर्गत ४७ कोटी ४८ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई बुचके, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे, तहसीलदार रवींद्र सबनीस, कृषिरत्न अनिल मेहेर, उद्योजक संजय वारुळे, सरपंच राजेंद्र मेहेर,  शाखा अभियंता भोसले, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, पी.एल.अडके,अभियंता व्ही.आर.पवार , साहेबराव गाडे, अभिषेक आहेर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राहुल फुलसुंदर,  विपुल फुलसुंदर, उपसरपंच ज्योती संते, सदस्या माया डोंगरे, नारायण दुधाने, प्रकाश भालेकर,  देवेंद्र बनकर, विनायक भुजबळ, संगीता काळे, रेखा फुलसुंदर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील दुःख संपविण्यासाठी सात कोटी स्वच्छता गृहाची उभारणी, नऊ कोटी घर तिथे गॅस कनेक्शन, तीनशे स्के.फुटाची तीन कोटी घरांची योजना तयार करून त्यापैकी दीड कोटी घरांचे वाटप केले आहे. ग्रामीण महिलांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी ‘घर घर नल से पाणी, हर घर नल से शुद्ध पाणी’ योजनेद्वारे ७० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी महाराष्ट्राला वीस हजार कोटी रुपये देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यासाठी दोन हजार कोटीची तरतूद करण्यात आली असून भाजपा शिवसेना युतीच्या राज्य सरकारने आज वारूळवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत शुद्ध पाण्याची टाकी बांधण्यासाठी ४७ कोटी ४८ लाख  ८७ हजार रुपये  मंजूर केले आहेत. पाईपलाईन द्वारे प्रत्येकी ५५ लिटर शुद्ध पाणी मिळणार असून पुढील तीस वर्षाची योजना आखण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेचा माझ्या हातून भूमिपूजन होत असल्याचा आनंद होत आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांसाठी ‘मातृ योजना’ आणली असून गर्भवती महिलेच्या बँक खात्यावर ६ हजार रुपये जमा होणार असून मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने मुलगी जन्माला आल्यानंतर लगेच ४ हजार, मुलगी १ ली च्या वर्गात ६ हजार ,८ वी.च्या वर्गात ८ हजार तर अठराव्या वर्षी ७५ हजार रुपये  असे एकूण ९३ हजार होत असली तरी १ लाख रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *