आळेफाटा पोलिसांची पुन्हा दबंग कारवाई :१३८० किलो मांस जप्त

जुन्नर (वार्ताहर:-विभागीय संपादक रामदास सांगळे)

आळेफाटा (ता.जुन्नर) शुक्रवार (दि.१५) रात्रीच्या सुमारास आळेफाटा पोलिसांनी कारवाई करत सुमारे १३८० किलो अंदाजे चौ-याऐंशी हजार रूपयांचे मांस जप्त केले आहे. पोलिसांनी केलेल्या या दबंग कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत आळेफाटा पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर आणि त्यांचे सहकारी यांची रात्रीची गस्ती सुरु होती या दरम्यान रात्रीच्या सुमारास संगमनेरहून कल्याण बाजूकडे भाजीपाला घेऊन जाणारा टेम्पो नं MH.04.KF.0882 हा आळेफाटा चौकात अडवून चेक केला असता सदर टेम्पो मध्ये पाठीमागील बाजूस भाजी पाल्याच्याखाली १३८० किलो मांस अवैधरीत्या वाहतूक करत असताना मिळून आले. यावेळी लागलीच सदर मांस व टेम्पो जप्त करण्यात आला असून सदर मांस वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण हत्या अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर पकडलेले मांस गोमांस असण्याची शक्यता आहे.

आळेफाटा पोलिसांनी दोनच दिवसांपूर्वी पिंपळवंडी स्टँड या ठिकाणी अवैध दारु अड्ड्यावर छापा टाकून देशी व विदेशी दारु असा एकूण सुमारे पावणेदोन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता त्यानंतर आळेफाटा पोलिसांनी पुन्हा ही कारवाई केल्यामुळे आळेफाटा पोलिसांचे कौतुक होत आहे.