रमजान ईद निमित्त कोरोना गरजु रुग्णांना अन्नदान…ख्वाजा गरिब नवाज फौंडेशनकडुन भटकंती ट्रेकर्स ग्रुपला ड्रायफ्रुट लाडुसह १०० ताटांचे जेवण..

नारायणगाव – (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील सामाजिक कामात अग्रेसर असणार्‍या ख्वाजा गरिब नवाज फौंडेशनकडून भटकंती ट्रेकर्स या ग्रुपसोबत रमजान ईद साजरी करण्यात आली. भटकंती ट्रेकर्स कोरोना रुग्णांसाठी राबवत असलेल्या अन्नदान उपक्रमासाठी रमजान ईदनिमित्त ड्रायफ्रुट लाडुसह १०० ताटांच्या जेवणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.


यानिमित्ताने मेहबुब काझी म्हणाले की, ख्वाजा गरिब नवाज फौंडेशनकडून रमजान ईदनिमित्त राबवलेला उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा असून भटकंती ट्रेकर्स मार्फत अविरतपणे कोरोना रुग्णांसाठीचा अन्नछत्र उपक्रम नारायणगावचे नाव उंचावणारा आहे. यावेळी नारायणगावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी यांच्यावतीनेही वाढदिवसानिमित्त १०० ताटांचे जेवण भटकंती ट्रेकर्स ग्रुपला देण्यात आले.
यानिमित्तानं ख्वाजा गरिब नवाज फौंडेशनचे मार्गदर्शक मेहबुब काझी, एजाज आतार, अध्यक्ष जुबेर आतार, उपाध्यक्ष रज्जाक काझी, सचिव रियाज मनियार, सहसचिव समीर इनामदार, कार्याध्यक्ष रेहान कुरेशी, सहकार्याध्यक्ष डाॅ.इम्रान शेख, खजिनदार तौसिफ पठाण, संचालक जावेद पटेल, इरफान काझी, प्रा.अशफाक पटेल, जुबेर शेख, जाकिर मनियार, दानिश इनामदार, मोईन इनामदार, फुरकान मोमिन, सोहेल इनामदार, सुफियान मोमिन, इब्राहिम पठाण, हैदर अन्सारी, अनिस इनामदार यांसह ग्रुपचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भटकंती ट्रेकर्स ग्रुपचे सुदिप कसाबे, तुषार दिवटे, प्रणव भुसारी, यांनी केलेल्या मदतीबद्दल ख्वाजा गरिब नवाज फौंडेशन व ज्ञानेश्वर औटी यांचा शाल देऊन सन्मान करत आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *