शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात; चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ ऑक्टोबर २०२२


बुधवारी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका, आरोप करण्यानं आले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांच्या नातावाचाही उल्लेख केला. उद्धव ठाकरेंच्या विधानवरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा नेत्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरू केली आहे. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसैनिक सोडून स्वत:ला मुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा शिवसैनिक सोडून स्वत:ला पक्षाध्यक्षपद, शिवसैनिक सोडून स्वत:च्या मुलाला मंत्रीपद, एखाद्या महिला शिवसैनिकेला सोडून स्वत:च्या घरात संपादक पद. माझं कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात. हे करत असताना त्याच्या आईच्या मनाची जराही कल्पना केली नाही की तिला काय वाटलं असेल? असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात. राजकारण इतक्या खालच्या पातळीला या अगोदर कधी गेलं नव्हतं आणि ज्यांनी नेलं त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे. असंही चित्रा वाघ यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *