छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित,१९६ आबेगाव विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सारंग कोडलकर यांची माहिती

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२८ सप्टेंबर २०२१

आंबेगाव

मा.भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या वतीने १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे अशी माहिती १९६ आबेगाव विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सारंग कोडलकर यांनी दिली.

ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी Voter Helpline Mobile App, www.nvsp.in वेबसाईट व Voter portal

tehsildar karyalay ambegaon
तहसीलदार कार्यालय आंबेगाव

संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

१) पूर्व पुनरीक्षण उपक्रमांतर्गत ९ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, दुबार/ समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणी / पडताळणी करणे व योग्य प्रकारे विभाग / भाग तयार करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

२) १ नोव्हेंबर २०२१ रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

३) १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दावे व हरकती पदनिर्देशित अधिकारी यांच्या मार्फत स्वीकारण्यात येणार आहेत. प्राप्त दावे व हरकती यांची प्रत मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे तसेच मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

४) दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी निश्चित केलेल्या दिवशी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.

दि. ५ जानेवारी २०२२ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार

५) दि. २० डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहेत.

६) दि. ५ जानेवारी २०२२ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार असून सदर प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी असे आवाहन सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार रमा जोशी यांनी केले आहे.

आंबेगाव विधानसभा मतदार संघात ३३६ मतदान केंद्र असून स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून आंबेगाव विधानसभा मतदार संघात संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची पुरेशी प्रसिद्धी करुन जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मोहिम आखण्यात येणार असून विविध राजकीय पक्षांची मंगळवार दि. २८/०९/२०२१ रोजी सायं. ०५ वा. तालुकास्तरावर बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती निवडणूक नायब तहसिलदार लतादेवी वाजे यांनी दिली.

ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी Voter Helpline Mobile App, www.nvsp.in वेबसाईट व Voter portal बाबत महाविद्यालय, सिनेमागृह, जाहिरात, केबल टिव्ही, वर्तमानपत्र, सोशल मिडिया इत्यादी मार्फत स्वीपच्या वतीने मोठ्या व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देण्यात येणार असल्याचे स्वीप पथकाचे प्रमुख सुनिल भेके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *