मनुवादी अस्त्रांपासून सावध राहा – सुषमा अंधारे

०६ डिसेंबर २०२२


शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे मागील काही दिवसांपासून ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा करत आहेत. सोमवारी त्या उस्मानाबाद दौऱ्यावर होत्या. याठिकाणी केलेल्या भाषणातून सुषमा अंधारेंनी विरोधकांवर टीका केली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, उद्या (६ डिसेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला मी बोलत आहे. बाबासाहेबांनी एक विचार लिहून ठेवला आहे की, जेव्हा तुमचं काम प्रचंड प्रभावी पद्धतीने वाढत असतं, तेव्हा लोक पहिल्यांदा तुम्हाला धाक दाखवतात. तुम्हाला धमक्या देतात, तुम्हाला घाबरवतात. पण जर तुम्ही त्यांच्या धाकाला घाबरला नाहीत किंवा त्यांच्या धमक्यांना भीक घातली नाही. तर ते दुसरं अस्त्र बाहेर काढतात, ते तुमच्याबद्दल अफवांचं राजकारण करतात. तुमच्याविषयी भ्रम निर्माण करतात. पण लोक भ्रमितही झाले नाहीत, तर ते तिसरं अस्त्र काढतात. तिसरं अस्त्र म्हणजे ते तुमचं चरित्रहनन करण्याचा प्रयत्न करतात. भय, भ्रम आणि चरित्रहनन ही तीनही मनुवादी अस्त्रं आहेत. यापासून सावध राहा असं आवाहन सुषमा अंधारेंनी केलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *