यंदाची प्रतिपंढरपूर यात्रा असणार भव्य-दिव्य

रामदास सांगळे
विभागीय संपादक, जुन्नर
०७ जुलै २०२२

बांगरवाडी


जुन्नर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री गुप्त विठोबा देवस्थान बांगरवाडी येथील आषाढी एकादशी यात्रा उत्सव सोहळा रविवार दि १० जुलै रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. पहाटे ५ वाजता महापुजा अभिषेक, दुपारी परिसरातून आलेल्या दिंडी सोहळ्याचें स्वागत सकाळी ८ वाजल्या पासून खिचडी महाप्रसाद वाटप,दिवस भर भजन, सायंकाळी हरिपाठ अशी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील.

गेली दोन वर्षे कोरोना मूळे यात्रा बंद होती त्यामूळे या वर्षी मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतील अशी शक्यता आहे. त्या साठी आळेफाटा पोलीस स्टेशन च्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तरी यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांच भाविकांनी पालन करावं असे आवाहन गुप्त विठोबा देवस्थान चे अध्यक्ष नकाजी बुवा बांगर व प्रसिद्धी प्रमुख गजानन फराटे यांनी केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *