पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क

०५ डिसेंबर २०२२


गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रानीप येथे निशान पब्लिक स्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. गुजरातची जनता सत्य ओळखणारी आहे. सत्याची साथ न सोडणारी आहे. गुजरातच्या जनतेने मतदानासाठी अधिक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या जनतेला केले. दुसऱ्या आणि अखरेच्या टप्प्यात अहमदाबाद, वडोदरा, गांधीनगरसह १४ जिल्ह्यांतील ९३ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमधील नारनपुरा येथील मतदान केंद्रावर सहकुंटुंब जात मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत जय शहा यांनीही मतदान केले. सकाळी ९ पर्यंत ४७५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. सर्वाधिक गांधीनगर येथे ७ टक्के मतदान झाले होते.

गुजरातमधील दुसर्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ते सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास रानीपमधील निशान शाळेतील मतदान केंद्रावर दाखल झाले. यावेळी उपस्थितांनी मोदी, मोदी, हर हर मोदी घर घर मोदी, जय श्रीराम यांसारख्या घोषणा दिल्या. त्यांनी रानीपमधील निशान शाळेत मतदान केले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर नरेंद्र मोदींचीआई हिराबेन या गांधीनगरमध्ये मतदान करणार आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *