वंदे भारत एक्स्प्रेसचा पुन्हा अपघात; गुरांना धडकल्यामुळे समोरच्या भागाचे नुकसान

०२ डिसेंबर २०२२


गुजरातमधील गांधीनगर ते मुंबई या मार्गावर प्रवास करणारी वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा एकदा जनावरांना धडकली आहे. उदवाडा आणि वापी रेल्वेस्थानकदारम्यान ही घटना घडली आहे. या अपघातात वंदे भारत एक्स्प्रेच्या समोरच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघाताची ही चौथी वेळ आहे.

गांधीनगरहून मुंबईकडे निघालेल्या ‘वंदे भारत’ एक्‍स्प्रेसपुढे शुक्रवारी (ता. १) संध्याकाळी गुजरातच्या उदवाडा आणि वापी रेल्वे स्थानकांजवळ गुरांचा कळप आला. ‘वंदे भारत’ने या गुरांना जोरदार धडक दिली; मात्र मोटरमनने लगेच ब्रेक दाबून गाडी थांबवली. त्यानंतर या अपघातात ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या पुढील भागाचे नुकसान झाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *