महिला दिन विशेष; हजारो हातांना रोजगार देणारी नारीशक्ती तस्मिया शेख

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पुणे- दि ८ मार्च २०२३


वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारी ध्येयवादी तरुणी तस्मिया शेख आज स्वतः एक ब्रँड बनुन एक महिला उद्योजिका म्हणून पुढे आली आहे.

ज्या वयात माध्यमिक शिक्षण पूर्ण करून उच्च माध्यमिक शिक्षणासाठी व नोकरीच्या शोधासाठी युवक युवती आपले नशीब आजमावत असतात.अशा वयात तिने हजारोंना नोकरी मिळवुन देण्यासाठी स्वप्न पाहिले व ते स्वप्न पूर्ण करून आपल्या ध्येयाचे शिखर गाठले आहे .
एका मुस्लिम मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेतलेल्या या युवतीने अनेक संकटांशी दोन हात करून आपल्या मनाशी गाठ बांधली होती.मला रोजगारावर काम करायचे आहे.हे स्वप्न मनाशी बाळगून तिने आज ते प्रत्यक्षात उतरविले आहे.वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी यामध्येच आपले करिअर करायचे असे ध्येय मनाशी बाळगून रोजगार चळवळ हाती घेऊन या तरुणीने एक आदर्श निर्माण केला आहे.
अशा या ध्येयवादी तरुणीची यशोगाथा प्रत्येक युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरली आहे.महाराष्ट्र,गुजरात,कर्नाटक सारख्या राज्यामध्ये आज रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ही तरुणी काम करत आहे.अभिमान वाटावा अशी यशस्वी वाटचाल या तरुणीची आहे. जिद्द मेहनत व चिकाटी त्या जोरावर तिने आपले यशस्वी शिखर गाठले आहे. दांडगा अनुभव व आपल्या व्यवसायातील चढ उतार पाहत तिने स्वतःच्या कामात पारदर्शकता आणली आहे.आपल्या क्षेत्रात उच्च दर्जाची सेवा देण्याचे काम ती करत आहे.त्या मुळे नौकरी मेळावा आणि तस्मिया हे समीकरण बनले आहे.असे या तरुणीला महाराष्ट्र नव्हे तर बाहेरील राज्यातून देखील नोकरी महोत्सव आयोजित करण्या करिता आमंत्रित केले जाते.विविध सामाजिक संघटना,शासकीय अधिकारी, व राजकीय पुढारी यांच्या मार्फत या नौकरी मेळावे आयोजित केले जातात.नोकरी मिळाव्यात येणाऱ्या हजारो बेरोजगार युवक-युवतींना निशुल्क पद्धतीने रोजगार दिला जातो रोजगार मिळवून देण्याकरिता तस्मिया यांनी स्वतःच्या नावाने पेटंट रजिस्टर असलेले जॉब कार्ड ही नवीन संकल्पना आनली आहे.हे असे माध्यम आहे ज्यामध्ये दररोज आपल्याला हव्या असलेल्या नोकरीच्या संधी आपल्या मोबाईल मध्ये एक लिंक द्वारे मिळत असतात व त्याचा उपयोग बेरोजगार युवक-युवतींना आपल्या भविष्याच्या रोजगारासाठी नक्कीच फायदेशीर ठरतात असे मत तस्मिया यांनी व्यक्त केले आहे.मेळाव्यात सहभागी होणाऱ्या युवक युवतींना कुठल्याही प्रकारचा शुल्क न आकारता बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी अशी ओळख तस्मिया यांनी निर्माण केली आहे.वाढत्या बेरोजगारीच्या समस्या डोळ्यासमोर ठेवून जॉबफेअर इंडिया या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्र नव्हे तर इतर राज्यातही बेरोजगारी हटवणे करिता त्या प्रयत्नशील आहेत.बेरोजगारी वर काम करत असताना अनेक समस्यांना सामोरे जात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने बेरोजगारी वर काम करत असताना अनेक समस्यांना सामोरी जात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतिने आज अनेक कुटुंबांना रोजगार मिळवून देऊन मदतीचा हात दिला आहे.युवक युवतींना रोजगार देण्याकरिता विविध क्षेत्रात देखील तिने आपला ठसा उमठविला आहे स्वतःच्या मालकीच्या आणखी दोन कंपन्या स्थापन करून यशस्वीरित्या वेगवेगळे व्यवसाय देखील ती करत आहे. हस्तनिर्मित (हॅन्डमेड) वस्तू व नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने उत्पादन करणारी कंपनी देखील यशस्वीरित्या चालवत आहे.आपल्यामधील व्यावसायिक क्षमता ओळखून प्रत्येक महिलेला अभिमान वाटावा असे कर्तुत्व निर्माण करून युवक-युवतींसाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर एक महिला उद्योजिका म्हणून पुढे आली आहे.सामाजिक संघटना व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी तिची दखल घेत वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.आज सर्वात मोठी समस्या असणाऱ्या आपल्या देशात बेरोजगारी या मुद्द्यावर काम करणारी ही तरुणी नक्कीच भविष्यात आपल्यासमोर एक चांगली उद्योजिका म्हणून समोरील यात शंका नाही.बेरोजगारी हटवण्यासाठी आपल्या विविध संकल्पनांना न्याय देण्याकरता मी नेहमीच प्रयत्नशील राहील असे मत त्यानी व्यक्त केले आहे.रोजगार सारख्या गंभीर मुद्द्यावर काम करण्याचे आव्हान पेलवणाऱ्या अशा या ध्येयवादी तरुणीला तिच्या भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

भविष्यात होणाऱ्या नौकरी मेळाव्यात सहभागी होण्याकरिता Jobfairindia.in/upcomingjobfair या वेब साईटवरील आपल्या जवळील नौकरी मेळाव्यात आपले नाव नोंदणी करा.

तास्मिया शेख यांना संपर्क करायचा असेल तर तुम्ही [email protected] या इमेल आयडीवर संपर्क करू शकता.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *