ड्वेन ब्रावोची आयपीएलमधून निवृत्ती; पुढील हंगामात दिसणार नव्या भूमिकेत

०२ डिसेंबर २०२२


सीएसकेच्या ड्वेन ब्रावोने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे.आयपीएलचा सोळावा हंगाम पुढील वर्षी खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर सोळाव्या हंगामाचा लिलाव या महिन्याच्या २३ तारखेला कोची येथे होणार आहे. या अगोदचर सीएसके संघाने मोठा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्जने लक्ष्मीपती बालाजी पुढील हंगामात संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक नसल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्याचबरोबर संघाने ड्वेन ब्राव्होला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

ड्वेन ब्राव्हो आयपीएलमधून निवृत्त; आयपीएल 2023 साठी चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती

सीएसकेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील व्हिडिओत नियुक्तीवर आनंद व्यक्त करताना ड्वेन ब्राव्हो म्हणाला, मी या नवीन प्रवासाची वाट पाहत आहे कारण माझे खेळाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर मी स्वत: नवीन असे काही करताना पाहत आहे. मला गोलंदाजांसोबत काम करणे आवडते आणि ज्याबद्दल मी उत्सुक आहे. मला खूप जुळवून घ्यावे लागेल कारण मी खेळत असताना, मी नेहमी गोलंदाजांसोबत काम करतो आणि फलंदाजांपेक्षा एक पाऊल पुढे कसे असावे यासाठी योजना आणि कल्पना मांडण्याचा प्रयत्न करतो. फरक एवढाच आहे की मी यापुढे मध्यभागी उभा राहणार नाही, असे ब्रावोने म्हटले आहे.

ड्वेन ब्रावो हा केवळ चेन्नई सुपर किंग्जसाठीच नव्हे तर आयपीएलच्या सर्वकालीन विक्रमात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने १५८ डावात १८३ विकेट्स घेतल्या आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *