महाविद्यालयातील करियर कट्टा उपक्रमाचा फायदा घेऊन उत्कृष्ट करिअर करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव यांनी केले

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२७ डिसेंबर २०२१

घोडेगाव


युवकांच्या सर्वांगिण कल्याणासाठी ऑनलाइन सुरू झालेल्या करियर कट्टा या उपक्रमात बी.डी.काळे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव यांनी केले. राज्य पातळीवरील करियर कट्टा या उपक्रमात बी.डी. काळे महाविद्यालयात क्यू .आर .कोड नामफलकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक तसेच करियर कट्टा उपक्रमाचे समन्वयक प्रा. सुनील नेवकर , मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, भूगोल विभाग प्रमुख डॉ. गुलाबराव पारखे, इंग्रजी विषयाचे प्रा.सोमनाथ जगताप, प्रा. संतोष खरात, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर मोकळ, प्रा. रेश्मा शिंदे, प्रा. शितल बोऱ्हाडे, राज्यशास्त्र विषयाचे प्रा. सचिन घायतडके, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.भाऊसाहेब थोरात, कार्यालयीन अधीक्षक श्री अशोक काळे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात सर्वत्र करिअर कट्टा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव म्हणाले की, रेल्वे ,पोस्ट ,बँकिंग इत्यादी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाद्वारे करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आय.ए.एस आपल्या भेटीला या कार्यक्रमात सहभागी व्हावे तसेच ज्यांना उद्योजक बनण्याची इच्छा आहे त्यांनी उद्योजक आपल्या भेटीला या कार्यक्रमात सहभागी व्हावे. तांत्रिक शिक्षण, प्रशिक्षण देऊन सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या आवडी प्रमाणे दिशा दाखवून त्यांना सक्षम करण्याची ताकद करियर कट्टा या उपक्रमात आहे . त्यामुळे बी. डी .काळे महाविद्यालयात करियर कट्टा हा उपक्रम सुरू केल्याचे प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव म्हणाले. कला ,वाणिज्य ,विज्ञान, व संगणक अशा सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी करियर कट्टा मध्ये सहभागी होऊन आपला सर्वांगीण विकास करावा.

विद्यार्थ्यांच्या क्षमतेप्रमाणे तसेच गुणवत्तेनुसार शिक्षण, प्रशिक्षणासह मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची सोय करियर कट्टा मध्ये आहे.त्यासाठी बी.डी .काळे महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. असे करियर कट्टाचे महाविद्यालयीन समन्वयक प्रा. सुनील नेवकर यांनी सांगितले. ऑनलाइन साधनांच्या आजच्या काळात शेताखाली, झाडाखाली, घरी असे कुठेही बसून जगातील सर्व उत्कृष्ट माहिती,ज्ञान देण्याची मोठी ताकद करियर कट्टामध्ये असल्याचे सांगून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी बी.डी.काळे महाविद्यालयातील करियर खट्टा उपक्रमाचा फायदा घेऊन उत्कृष्ट करिअर करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव यांनी केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *