शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती ही एकाचं शक्तीची रूपं – उद्धव ठाकरे

०१ डिसेंबर २०२२


शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती, ही एकाच शक्तीची रूप आहेत. या तिन्ही शक्ती एकवटल्या तर किती प्रचंड मोठी ताकद महाराष्ट्रात नाही तर देशात होईल. असे संकेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वांद्रे येथील लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती महोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईमध्ये तुमची संख्या अडीच तीन लाख असेल. संख्या किती महत्त्वाची हे निवडणुकीच्या वेळेला कळते.

मुंबई आपली राजधानी आहे. लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे यांचा आपण जयजयकार करतो. अण्णाभाऊ संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष केला. त्यांनी मिळवून दिलेली मुंबई आपल्या ताब्यात ठेवायची आहे. मी मुख्यमंत्री होतो पण, थापा कधी मारल्या नाही. पाठीवर कौतुकाची थाप मारली, पण, अशा थापा मारल्या नाहीत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *