जागतिक पर्यावरण दिना निमित्त घोडेगाव वनविभागामार्फत आदिवासी पश्चिम पट्टयात ५००० वृक्ष लागवडीचा संकल्प…

शिनोली : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पाश्चिम पट्टयातील,वनपरिमंडळ शिनोली हद्दितील उगलेवाडी -फदालेवाडी ग्रामपंचायत परिसरात आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन ग्रामस्तांच्या हस्ते वृक्षरोपन करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
          आज ऑक्सिजनची कमतरता सिलेंडरपेक्षा निसर्गच अधिक उत्तम प्रकारे भागवू शकतो
या निसर्गाचे संवर्धन ही आपल्या प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावण्याबरोबर  त्याच्या संगोपनाची जवाबदारी घ्यावी, वन विभाग झाडे लावतोय आपण फक्त ती जगवूया यालाच महत्व आहे. असे या वेळी शिनोलीचे उपसरपंच सुनील बोऱ्हाडे  म्हणाले.


वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या उगलेवाडी फॉरेस्ट कपांर्टमेंट परिसरात ५००० फळ,औषधी अरोग्यासाठी लाभदायक अशा रोपांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच या वृक्षाचे संगोपन स्थानिक कुंटबांना  देण्यात येणार असल्याचे वनविभागा मार्फत सांगण्यात आले.
या प्रसंगी शिनोलीचे उपसरपंच सुनील बोऱ्हाडे , अरोग्य विभागाचे सावंत , जिल्हा परिषद माजी सदस्य जनाबाई उगले, कृषी विभागाचे नागेश मोरे उगलेवाडीचे माजी सरपंच शांताबाई उगले , विदयमान सरपंच मिनाताई उगले, बजरंग उगले , वनपाल गुलाब इथापे, वनरक्षक , इगंवले, संदीप मुंढे,किशोर लोखंडे आदी सह वनकर्मचारी स्थानिक नागरिक उपस्थीत  होते.कोरोनाच्या नियमांचे पालन करुन सदर वृक्षलागवड कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *