आंबेगाव : -प्रतिनिधी मोसीन काठेवाडी
आज आंबेगाव तालुक्यातील महावितरण कार्यालय मंचर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष समीरभाऊ थिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले होते. ग्राहकांना येणारी प्रंचड बिले या विषयावर हे आंदोलन होते.
या बद्दल सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागे ११ ऑक्टोबर रोजी महावितरण कार्यालयाला काही मागण्यांसंदर्भात निवेदन दिले होते, मात्र त्यावर कोणत्याही प्रकारचे ठोस उत्तर मिळाले नाही. ग्राहकांची लूट थांबवली गेली नाही. उलट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवेदनाला त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे आज मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष वैभवजी बाणखेले आणि तालुका अध्यक्ष संतोष बोऱ्हाडे यांनी महावितरणला दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तिथे पोचताच अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या समस्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या त्यात प्रामुख्याने वाढीव वीज बिले, कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा आणि वेळेवर न घेतलेले रीडिंग या प्रमुख समस्यांचा समावेश होता. त्या नागरिकांसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कर्मचार्यांना धारेवर धरले आणि त्यांची बोलती पूर्णपणे बंद केली. सर्व नागरिकांच्या समस्या जर सुटल्या नाही आणि आमच्या निवेदनाला जर ३ दिवसाच्या आत उत्तर मिळाले नाही तर मनसे स्टाइलने खळ्ळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष वैभवजी बाणखेले तसेच तालुका अध्यक्ष संतोष बोऱ्हाडे यांनी या वेळी महावितरणला दिला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष वैभवजी बाणखेले, आंबेगाव तालुकाध्यक्ष संतोषभाऊ बोऱ्हाडे, तालुका सचिव अशोकजी शेटे, मंचर शहराध्यक्ष सागरभाऊ घुले, संपर्क प्रमुख बाबाजी देवडे, तालुका उपाध्यक्ष नवनाथ फलके, घोडेगाव शहराध्यक्ष विशालभाऊ शिंदे, मयुरेश लांडे, ओंकार तुळेकर, सुदर्शन बांगर, अनिकेत शिंदे, संजय तेवाळे, बंडू फाले, अनेक महाराष्ट्र सैनिक त्याचप्रमाणे वीज ग्राहक उपस्थित होते.