श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखड्यातील कामांसाठी ०.२८७ हेक्टर वन जमीन देण्यास मान्यता

दि. ०३/०१/२०२३
पुणे


पुणे : श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखड्यातील पायरी मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी खेड तालुक्यातील मौजे भोरगिरी व आंबेगाव तालुक्यातील मौजे निगडाळे येथील एकूण ०.२८७ हेक्टर वन जमीन वळतीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता रा. य. पाटील यांनी दिली आहे.

राखीव वन क्षेत्राअंतर्गत भोरगिरी येथील गट क्रमांक १३० (सी. नं. २०१- क्षेत्र ०.०८४ हेक्टर) निगडाळे येथील गट क्रमांक २४४ (सी.नं. २०० ए- क्षेत्र ०.१६८, ०.०२० व ०.०१५ हेक्टर ) अशी एकूण ०.२८७ हेक्टर वन जमीन वळतीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

वन जमीन वळतीकरणास मान्यता देतांना पुढील अटी व शर्तीचे अधीन राहून मान्यता दिली आहे. प्रकल्प यंत्रणा वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत केंद्र शासनाने तत्वत: मान्यता दिलेल्या आदेशातील सर्व अटींचे पालन केल्याची उप वनसंरक्षक (वन्यजीव) पुणे यांनी खात्री करावी. अधिनियमातील अटींचे अनुपालन न करणाऱ्यांवर वैधानिक कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यात येऊ नये. मजुरांचे वास्तव्यासाठी वनक्षेत्रात तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात येऊ नये. हे मान्यता आदेश १ वर्षापर्यंत वैध राहतील, असेही श्री. पाटील यांनी कळवले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *