माझ्या नातवाचा जन्म झाला आणि तुमचं अध:पतन सुरु झालं – एकनाथ शिंदे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०६ ऑक्टोबर २०२२


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांवर निशाणा साधला. बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माझा नातू दीड वर्षाचा आहे. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. कुणावर टीका करताय त्या दीड वर्षाच्या बाळावर. कोणत्या पातळीवर पोहोचला आहात? पायाखालची वाळू सरकली ना. तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुमचा मुलगा मंत्री झाला. आम्ही काही बोललो का? लाज तुम्हाला वाटायला हवी होती. बाळासाहेबांच्या विचारांना तोडून मोडून तुम्ही सत्ता मिळवली. छातीवर दगड ठेवून मी तुमच्यासोबत राहिलो. मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *