बेकायदारित्या गांजा बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस गुन्हे शाखेच्या अमली विरोधी पथकाची एकाला अटक

३० नोव्हेंबर २०२२


बेकायदारित्या गांजा बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस गुन्हे शाखेच्या अमली विरोधी पथकाने एकाला अटक केली. त्याच्याकडून एक लाख पाच हजाराचा गांजा जप्त केला. ही कारवाई बावधन येथे करण्यात आली. हारून बाबू खान (वय ३४, रा. उत्तमनगर, बावधन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर आशिष पांडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीकडे गांजा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार छापा टाकला असता खान याच्याकडे एक लाख पाच हजार ७५० रुपये किमतीचा गांजा सापडला. त्याच्याकडून गांजासह २० हजारांचा एक मोबाईल असा एकूण एक लाख २५ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *