ग्रीन ॲप्पल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटीकल केयर सेंटर चा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी : लक्ष्मण दातखिळे
ठिकाण : दापोडी
दि. ३० ऑगस्ट २०२१

दापोडी दापोडी येथील ग्रीन अँपल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटीकल केयर सेंटर या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  
                       दापोडी येथे नव्याने सुरु झालेल्या या हॉस्पिटल मध्ये हृदयविकार, डायबेटीस, अपघात, मॅटरनीटी, डोळ्यांचे आजार इत्यादी आजारांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार पद्धती उपलब्ध करण्यात आली आहे. ICU बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड आदी तंत्रज्ञान पद्धतीने उपचार पद्धती हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहे. तसेच रुग्णांसाठी वातानूकुलित आणि प्रशस्त वॉर्ड, मेडिकल सुविधा, OPD आदी सेवा हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
                       या हॉस्पिटलच्या उदघाटन सोहळ्यानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर, नगरसेवक संजय नाना काटे, माजी नगरसेविका अर्चना कांबळे, माजी नगरसेविका चंद्रकांताताई सोनकांबळे, आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे, पिंपरी – चिंचवडचे शहर प्रमुख तुषार आनंदराव नवले, सामाजिक कार्यकर्ते संदीप गायकवाड, नगरसेवक संजय कणसे, सामाजिक कार्यकर्ते अजय जाधव, आदी मान्यवरांनी उपस्थित राहून या नूतन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.
                      यासोबतच हॉस्पिटल पॅनल चे डॉक्टर डॉ. प्रसाद कासीकर एमडी मेडिसिन, डॉ. ऋषीकिरण पवार डी ऑर्थोपेडिक, डॉ. ललित सांगुळकर एमडी पेडीट्रिक, डॉ. मंदार रानडे एमडी गायनॅक, डॉ. प्रताप वळसे-पाटील एमडी होमिओपॅथिक, अंजली सूर्यवंशी आदी मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *