ठाकरे गटासोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार

२९ नोव्हेंबर २०२२


राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने शिवसेना ठाकरे गटासोबत युती करण्याची घोषणा केली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी माहिती दिली. उद्धव ठाकरे गटातील नेते सुभाष देसाई यांच्याशी दोन बैठका झाल्या असून आम्ही उद्धव ठाकरे गटाशी युती करण्यास तयार आहोत, असे रेखा ठाकूर यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होण्याचे संकेत आहेत. आम्ही त्याबाबत सकारात्मक आहोत. मात्र आम्हाला एका गोष्टीवर स्पष्टीकरण हवे आहे. सध्या शिवसेना महाविकास आघाडीचा भाग आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी शिवसेना हादेखील एक पक्ष आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीतील चौथा पक्ष असेल की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार, याबाबत आम्हाला निश्चितता हवी आहे. त्यानंतरच पुढचे बोलणे सुरू होईल, असे रेखा ठाकूर यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *