खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या फोनमुळे १५ लाखांची मोफत शास्रक्रिया

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१७ मार्च २०२२

आणे


आणे (ता.जुन्नर) गावचे रहिवासी प्रवीण दाते यांची अवघ्या ६ महिन्यांची मुलगी प्रिशा हिच्या हृदयाला जन्मतःच छिद्र होते. शस्त्रक्रियेसाठी तब्बल १५ लाख रुपये खर्च येणार होता. संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या एका फोनमुळे मुंबईच्या कोकिलाबेन या नामांकित रुग्णालयात प्रिशा हिची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत व यशस्वीपणे पार पडली. प्रवीण दाते हे सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील असून एवढी मोठी रक्कम उभी करणे त्यांच्यासाठी अवघड होते. परंतु त्यांनी डॉ.कोल्हे यांना फोन करून ही समस्या सांगितली. त्यावर कोल्हे यांनी तत्परतेने त्यांना मदत केली. मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. मुलीला नुकताच डिस्चार्ज दिला असून तिची प्रकृती सुधारणा झाली आहे. ती हसायला खेळायला लागली असून त्याची कुटुंबात आनंदच वातावरण आहे.

आणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पठार विभाग प्रमुख प्रशांत दाते, शिंदेवाडी गावचे सरपंच एम.डी.पाटील शिंदे, माजी सरपंच रोहिदास शिंदे व आणे ग्रामस्थांनी कोल्हे यांचे आभार मानले.याबद्दल प्रवीण दाते व त्यांच्या पत्नी यांनी ही फोन करून खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *