बेल्हे बाजारात जनावरांची आवक जावक वाढली…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.6/7/2021

बेल्हे बाजारात जनावरांची आवक जावक वाढली

बातमी:-विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

बेल्हे :- कोरोनाच्या संकटामुळे अनेक महिन्यापासून बंद असलेला बेल्हे (ता.जुन्नर) येथील बैलांचा बाजार महिन्या भरापूर्वी सुरू झाला. सोमवार (दि.५) रोजी बैलांचा ५ वा बाजार भरला होता. दिवसभरात २०१ म्हशी व पारडू व २८१ बैल,२६८ शेळ्या व मेंढ्या असे एकूण ७५० जनावर विक्रीसाठी आली होती.त्यापैकी १९४ म्हशी व पारडू तसेच २६७ बैल,तर २३२ शेळी व मेंढ्यां अशा एकूण ६९३ जनावरांची विक्री झाली असल्याची माहिती बेल्हे बाजारसमितीचे कार्यालय प्रमुख प्रमोद खिलारी यांनी दिली.

व्यापारी व शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद असल्यामुळे अनेक विक्रीसाठी आणलेल्या जनावरांना परत घेऊन जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. कोरोना च सावट या बाजारावर अद्याप असून बैलांचे व म्हशींचे दरही कोसळले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं. परंतु दिवसेंदिवस जनावरांची बाजारात आवक जावक वाढत चालल्याने समाधानाचे वातावरण आहे. परंतु शेतकरी व व्यापाऱ्यांनी करोनाच्या नियमांचे पालन करून व्यापार करणे सध्याच्या परिस्थितीत मोलाचे आहे.

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *