संजय राऊत यांच्याविरोधातील ईडीच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार

२९ नोव्हेंबर २०२२


पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मंजूर केलेला जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने सोमवारी नकार दिला. तसेच याचिकेवर १२ डिसेंबर रोजी सुनावणी होणार.

ईडीच्या याचिकेवर आपण काही कारणास्तव सुनावणी घेऊ शकत नसल्याचे नमूद करून न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने गेल्याच आठवडय़ात या प्रकरणापासून स्वत:ला दूर ठेवले. त्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठासमोर ईडीने सोमवारी याचिका सादर करून त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता काय? अशी विचारणा करून न्यायालयाने ईडीची तातडीच्या सुनावणीची मागणी फेटाळली. तसेच प्रकरणाची सुनावणी १२ डिसेंबर रोजी ठेवली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *